Plantation
Plantation 
मुंबई

बापगाव येथे 125 झाडांचे वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. सरकारच्या या उपक्रमात सहभागी होत सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीतर्फे कल्याणजवळील बापगाव येथे 125 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही मंडळाने उचलली आहे.

जून महिन्यात साजरा होणारा पर्यावरण दिन तसेच जुलैमध्ये सरकारतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त मंडळाने आज (रविवार) सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भारतीय जातींच्या वृक्षांचे यावेळी रोपण करण्यात आले. मंडळाचे संचालक भालचंद्र जोशी, मयूरेश आगलावे त्याचबरोबर बापगाव ग्रामपंचायतीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह या वृक्षारोपण मोहीमेत सहभाग नोंदविला.

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सुभेदार वाडा गणेशोत्सव मंडळाने विविध उपक्रम राबवले आहेत. जनसंपर्क वाढविण्यासाठी मंडळाने प्रत्येक महिन्याला शहराच्या वेगवेगळ्या भागात आरतीचे कार्यक्रम केले आहेत. चित्रकला, रांगोळी अशा स्पर्धांचेही मंडळाने आयोजन केले होते. ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलच्या सहकार्याने मंडळातर्फे एकदिवसीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. जुलै महिन्यात ज्येष्ठ नागरिक तसेच विविध गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच पाठांतराच्या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. कल्याणातील माहेरवाशिणींचे संमेलन घेण्याचाही मंडळाचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT