1255 election officials-employees occupied 251 polling booths in Ulhasnagar lok sabha polling  Sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य पोहचले; प्रत्येक केंद्रावर व बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर -रविवारी 20 तारखेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उल्हासनगर विधानसभा मतदार संघात 251 मतदान केंद्र तयार करण्यात आले असून आज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या उपस्थितीत या केंद्रा करिता ईव्हीएम मशिनसह निवडणुकीचे साहित्य वाटप करण्यात आले आहे.

त्यानुसार या साहित्या सोबत 1255 अधिकारी-कर्मचारी हे केंद्रांकडे रवाना झाले असून त्यांनी केंद्रांचा ताबा घेतला आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक पोलीस तर केंद्राच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली आहे.यावेळी तहसीलदार कल्याणी मोहिते,अक्षय ढाकणे,महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे उपस्थित होते.

उल्हासनगर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लाख 39 हजार 848,महिला मतदार 1 लाख,17 हजार 422,तृतीयपंथी मतदार 97 असे एकूण 2 लाख,57 हजार 367 मतदार आहेत.1255 अधिकारी-कर्मचारी हे 251 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे काम करणार आहेत.तसेच 212 हे मतदान केंद्र दिव्यांगसाठी तयार करण्यात आलेला असून मतदान केंद्र क्रं.89 हा गुलाबी मतदान केंद्र महिलांसाठी तयार करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT