मुंबई

वाडिया रुग्णालयाला १३ कोटींचे अनुदान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने थकीत अनुदान न दिल्यास रुग्णालय बंद करण्याचा इशारा परळ येथील वाडिया रुग्णालय ट्रस्टने देताच शुक्रवारी (ता. ६) पालिका प्रशासनाने १३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या महापालिका मुख्यालयातील दालनात शुक्रवारी आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाडिया रुग्णालयाच्या हिशेबात घोळ असल्याचा दावा करत महापालिकेने तीन वर्षांचे ९७ कोटी रुपयांचे अनुदान रोखले होते.

वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढलेला असताना महापालिकेकडून अनुदान मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचेही पगार रखडलेले आहेत. त्यामुळे आता रुग्णालय बंद करण्याखेरीज पर्याय नसल्याची भूमिका वाडिया रुग्णालयाच्या ट्रस्टने घेतली होती. तसे, महापालिका प्रशासनालाही कळवले होते. याचे पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले. प्रसूती आणि बालरोग उपचारात हे रुग्णालय देशात नावाजले जाते. तसेच हे रुग्णालय

सर्वसामान्यांसाठी मोठा आधार आहे. यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली. या वेळी त्यानुसार वाडिया रुग्णालयाला १३ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालिकेला हवाय १०० टक्के हिस्सा?
वाडिया रुग्णालयात ६०० खाटा असून त्यातील ३०० खटांचा खर्च महापालिकेकडून केला जातो; तर या रुग्णालयात वर्षाला पाच ते सहा हजार शस्त्रक्रिया होतात. निम्मे अनुदान मिळत असल्याने महापालिकेला या रुग्णालयात ५० टक्के वाटा आहे; मात्र पालिकेला हे रुग्णालय संपूर्ण ताब्यात घ्यायचे असल्याची चर्चाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT