Mumbai News  esakal
मुंबई

Mumbai News : पारंपारिकच्या १४ लाख मुलींना 'मोफत'मधून डावलले; मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे मनसुबे यशस्वी

केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काची प्रतिपूर्ती

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षणासह कृषी आदी व्यावसायिकच्या पदवी-पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक शुल्काची १०० टक्के शुल्क प्रतिपूर्तीची देण्यासाठीच्या निर्णयाचा आज शासन निर्णय जारी करण्यात आला. मात्र यात पारंपारिकच्या कला, वाणिज्य विज्ञानशी संबंधित बहुतांश अभ्यासक्रमांना वगळण्यात आले आहे. यामुळे १४ लाखांहून अधिक पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना या योजनेतून बगल देण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची घोषणा झाल्यानंतर यासंदर्भात 'सकाळ'ने मागील काही दिवसांपासून पारंपारिक अभ्यासक्रमांना वगळले जात असल्याची बाजू समोर आणली होती. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची मूळ संकल्पना ही सर्व अभ्यासक्रमांसाठी होती. तशी त्यांनी घोषणाही केली हेाती. मात्र अर्थसंकल्प आणि त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारंपारीक शिक्षणाचा मुद्दाच काही अधिकाऱ्यांनी अडवणून धरला होता. या शिक्षणासाठी शुल्क प्रतिपूर्ती मिळते अशी चुकीची माहिती पसरवून हा विषयच रोखून धरला होता. यामुळे या अधिकाऱ्यांचे मनसुबे आज शासन निर्णय आल्यानंतर यशस्वी झाले असल्याचे शिक्षण तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

दरम्यान आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत प्रवेश झालेल्या परंतु व्यवस्थापन कोटा अथवा संस्थांत्मक प्रवेश वगळून इतर मुलींच्या शैक्षणिक शुल्काची १०० टक्के शुल्क प्रतिपूर्ती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी मुलींच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपयांहून कमी असणे ही महत्वाची अट टाकण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी ९०६ कोटी रूपयांची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.

ईडब्ल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रा ऐवजी आई व वडील (दोन्ही पालकांचे) एकत्रित उत्पन्नावर आधारीत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. यात शिष्यवत्ती आदींचा प्रथम वर्षी लाभ मिळाला असेल तर दुसऱ्या वर्षांपासून या योजनेचा लाभ मिळू शकेल. शिवाय अनाथ मुलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bima Yojana: आशा सेविका, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य कर्मचारी विमा योजनेचा लाभ मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs IRE 1st T20I: श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचे दोन विक्रम मोडले; आयर्लंडला गोलंदाजांनी रडवले

MPSC Group C Online Exam Protest: एमपीएससी गट-क ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध; फडणवीसांचे चर्चेनंतरच अंतिम निर्णयाचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : नाशिक सायबर पोलिसांची कारवाई, ऑनलाइन बेटिंग चालवणाऱ्या पाच आरोपींना केली अटक

ENG vs NZ 3rd Test: बेन स्टोक्सचा भीमपराक्रम! जॅक कॅलिसनंतर जगात असा विक्रम नोंदवणारा तोच; इंग्लंडच्या कर्णधाराने केली हवा...

SCROLL FOR NEXT