Kalyan Breaking News Esakal
मुंबई

Kalyan Breaking News: नवी मुंबई पालिकेत कल्याण ग्रामीणमधील गावांचा समावेश; 'ती' १४ गावे कोणती?

Kalyan Breaking News: कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या '14 गावांचा' समावेश नवी मुंबई पालिकेत करण्यात आला आहे. गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या '14 गावांचा' समावेश नवी मुंबई पालिकेत करण्यात आला आहे. गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नाना यश आले असून नवीमुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवीमुंबई पालिकेमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी केली होती. गाव विकास समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबतची मागणी लावून धरली होती.

आमदार राजू पाटील यांच्या मागणीनंतर आणि प्रयत्नानंतर आता कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवीमुंबई पालिकेत समावेश करण्यात आला आहे. नवीमुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या 4 अभियंत्यांना मूळ विभागाचे कामं संभाळून १४ गावांचे अतिरिक्त कामकाज सांभाळावे लागणार आहे. भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे आणि दहिसर मोरी, दहिसर, निघू, मोकाशीपाडा, नावाळी, या गावांचा यामध्ये समावेश आहे. 14 गावांच्या मालमत्ता हस्तातरणाच्या कामाला 11 तारखेपासून होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गांधीजींनी २१ दिवस उपोषणात लिंबू तर सोनम सरांनी २६ दिवस फक्त...; अभिजीत दीपकेचा मोठा खुलासा

Abhijeet Dipke on Jai Bhim : 'जय भीम' हा नारा केवळ एका समाजाचा नाही; अभिजीत दिपके यांचे वक्तव्य, 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये अनेक खुलासे

Abhijit Dipake: योगी, मोदी, BJP आयटी सेलचे लोक शिवीगाळ करतात, त्यांच्यावर FIR का नाही? अभिजीत दिपकेंचा सवाल

Sangli Kolhapur Flood Risk : कर्नाटकची मुजोरी अन् सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका! आलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यावरून 'इरिगेशन फेडरेशन'चा इशारा

Latest Marathi News Live Update : अमित शहासुद्धा हसत असतील, भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावर अभिजीत दीपकेचं उत्तर

SCROLL FOR NEXT