accident in mumbai goa highway one dead and two injured in khed
accident in mumbai goa highway one dead and two injured in khed 
मुंबई

मैदानात क्रिकेट खेळत असतानाच खेळाडूला कारने उडवलं

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवलीतील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात क्रिकेट खेळत असताना एका 14 वर्षीय मुलाचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून प्रशांत मिश्रा (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे. प्रशांतचे वडील दिलीप यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी कार चालक जयेश नरलेकर (वय 25) याला अटक केली आहे.

दिलीप मिश्रा (वय 39) हे व्यावयासिक असून आजदेगावातील साईमाऊली सोसायटीत ते राहतात. दिलीप यांचा मुलगा प्रशांत नेहमीप्रमाणे पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडासंकुलात किक्रेट खेळण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेला होता. मैदानात संध्याकाळी पाचच्या दरम्यान क्रिकेट खेळत असताना क्रींडागणात आजदे गाव येथे राहणारा जयेश क्रीडासंकुलात आपली वॅगनॉर कार भरधाव वेगाने चालवित होता. बेशिस्तपणे, हयगयीने मोटार चालवित असताना जयेशचा कारवरील ताबा सुटून मैदानात क्रिकेट खेळत असलेल्या प्रशांतला कारची धडक बसली. कारच्या धडकेत प्रशांत जमिनीवर कोसळला. त्याला मित्रांनी तात्काळ रूग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्रशांतचे वडिल दिलीप मिश्रा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल करतकार चालक जयेश ला अटक केली आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. के. गांगुर्डे करत आहेत.

वाढदिवसाच्या दिवशीच अपघात

प्रशांतचा आज वाढदिवस होता. याचदिवशी त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह त्याच्या मित्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : मताधिक्य राखण्याचे दिग्गजांपुढे आव्हान ; दहापैकी सात जागांवर मिळाला होता लाखो मतांनी विजय

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Latest Marathi News Live Update : दिल्ली अग्निशमन विभागाला 60 हून अधिक फोन; शाळांमध्ये बॉम्ब तपासणी सुरू

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT