Crime Sakal
मुंबई

Thane Crime News: 14 वर्षीय मुलीवर टेनिस कोचचा अत्याचार; पीडिता 7 आठवड्यांची होती गरोदर

कार्तिक पुजारी

ठाणे- १४ वर्षीय एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका चाळीस वर्षीय टेनिस प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील ही घटना असून मुलगी सात आठवड्याची गर्भवती झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (14 year old girl in thane assaulted by tennis coach)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षकाचे नाव रविकिरण गवळी असे असून तो नवी मुंबईचा रहिवाशी आहे. पीडित मुलीला टेनिसचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली होती. एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबियांना प्रशिक्षक गवळीवर विश्वास असल्याने त्याला कामावर ठेवले होते.

कपूरबावडी पोलिस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात पोटात दुखत असल्याची तक्रार कुटुंबियांकडे केली होती. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी तिला औषधे देण्यात आली.

दोन दिवसांनतरही जेव्हा पोट दुखणे कमी झाले नाही. तेव्हा तिला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी मुलीची सोनोग्राफी करण्यात आली. यात मुलगी सात आठवड्यांची गरोदर असल्याचं समोर आलं.

दाव्यानुसार, टेनिस प्रशिक्षक मुलीला आक्षेपार्हरीत्या स्पर्श करायचा. मुलगी यामुळे निराशेमध्ये गेली होती. त्यानंतर त्याने जबरदस्तीने मुलीशी लैंगिक संबंध ठेवले. माहितीनुसार, आरोपी गवळीचे लग्न झाले असून त्याला दोन मुलं आहेत. स्पोर्ट शिक्षक म्हणून तो कोचिंग चालवतो. अनेक शाळा आणि सोसायटीमध्ये तो प्रशिक्षण देतो. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टासमोर हजर करण्यात आलंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT