CCTV Footage Sakal
मुंबई

CCTV Footage : वडिलांची कार घेऊन 14 वर्षाच्या मुलाने वृद्धास चिरडले; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एका १४ वर्षीय मुलाने रस्त्यावरून जात असणाऱ्या एका वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील पवई कांदिवली या परिसरात घडली आहे. या १४ वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या पालकांची गाडी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर अल्पवयीन मुलाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोसायटीच्या गेटमधून गाडी बाहेर काढताना त्याच्याकडून गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीचा वेग अचानकपणे वाढला आणि रस्त्यावरून जात असलेल्या वृद्ध व्यक्तीला चिरडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

तर पुढे गेल्यानंतरही रस्त्यावरून गाडी नागमोडी पद्धतीने आणि वेगाने पुढे जाताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सदर मुलाच्या पालकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे. पालकांनीही अशा लहान मुलांकडे गाडीची चावी देण्यापूर्वी विचार केला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT