मुंबई

#VIDEO : आम्हाला कोरोना नाही, हव्या तेवढ्या टेस्ट घ्या! पण आम्हाला घरी जाऊ द्या

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : युरोप मधून मुंबईत आलेल्या जहाजात 147 भारतीय लोक अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना मुंबईत उतरता येत नाही. सरकार ने यात हस्तक्षेप करून आमची सुटका करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

युरोपवरून ट्वि मरेला डिस्कव्हरी जहाज 31 दिवसांपूर्वी मुंबईच्या दिशेने निघाले. 15 दिवसांपूर्वी हे जहाज भारताच्या हद्दीत आले.गेल्या पाच दिवसांपासू मुंबईच्या 100 नॉटिकल मैल अंतरावर हे जहाज थांबवण्यात आले आहे. या जहाजात भारतातील 147 कर्मचारी  अडकले आहेत. त्यात मुंबईतील 35 जण असून बाकी इतर राज्यातील आहेत. 

युरोप मधील हे जहाज असून त्यावर काम करणारे हे सर्व कामगार आहेत. या जहाजावर या कामगारांसाठी सर्व अन्न-धान्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलाय आहे. तरी देखील त्यांनाकोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. पुढील पाच दिवसात त्यातील लोकांना मुंबईत  घेतले नाही तर हे जहाज या सर्व कामगारांना घेऊन पुन्हा कोचीन कडे रवाना होईल. युरोप मध्ये गेलो तर पुन्हा भारतात यायचे कसे हा प्रश्न या कामगारांना सतावत आहे. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी या सर्व लोकांनी राज्य सरकारकडे विनंती केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT