crime sakal
मुंबई

Mumbai : सुटकेसमध्ये आढळला 15 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह; घटनेनं खळबळ

पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Minor Girl Body Found In Briefcase : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील नायगाव रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी बंद सुटकेसमध्ये १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह आढळूल आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हत्या झालेली मुलगी गुरुवारी दुपारपासून अंधेरी येथील तिच्या घरातून बेपत्ता होती. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वालीव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नायगाव रेल्वे पोलिसांना फोन आला की, नव्याने बांधलेल्या पूर्व-पश्चिम पुलाजवळील झुडपात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर एका बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. संबधित मुलीच्या पोटावर वार झाल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे तिची हत्या झाली असावी असा अंदाज आहे. घटनास्थळी आढळलेल्या बॅगेत एक टॉवेल आणि काही कपडे तसेच अंधेरीतील एका शाळेचा शाळेचा गणवेश होता.

अंधेरी पोलीस ठाण्याच्या अधिका-यांनी सांगितले की, संबंधित मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत जाते म्हणून अंधेरीतील घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाख केली होती. पालकांच्या तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी बेपत्ता मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासणार

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, मृत मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध नेण्यात आले की, ती कोणासोबत जाण्यास तयार होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा शोध घेण्यासाठी अंधेरी ते नायगाव स्थानकांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग स्कॅन केले जाणार आहे. याशिवाय मृत मुलीचे घर आणि शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगदेखील स्कॅन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT