154 metric tons of garbage on the beaches Mumbai
154 metric tons of garbage on the beaches Mumbai Sakal
मुंबई

समुद्रकिनाऱ्यांवर १५४ मेट्रिक टन कचरा

विकास खिलारी

मुंबई - मुंबईलगतच्या समुद्राला आलेल्या भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेल्या कचऱ्याने घनकचरा विभागाच्या डोक्याला चांगलाच ताप केला आहे. भरतीमुळे गेल्या दोन दिवसांत समुद्रकिनाऱ्यांवर तब्बल १५४ मेट्रिक टन कचरा जमा झाला. सर्व कचरा साफ करण्यात आला असला, तरी या कचऱ्याने घनकचरा विभागाच्या नाकी नऊ आणले.

मुंबईत पावसाने बऱ्यापैकी जोर धरला आहे. त्यातच समुद्राला भरती येऊन उंचच उंच लाटा उसळतात. शनिवारी आणि रविवार अरबी समुद्राला मोठी भरती आली. रविवारी आलेल्या भरतीमुळे समुद्रात ४.४६ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या. या लाटांमुळे शनिवारी ९३.१८; तर रविवारी ६०.९४ मेट्रिक टन कचरा समुद्र किनाऱ्यावर फेकला गेला. यामुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल १५४.१२ मेट्रिक टनाहून अधिक कचरा किनाऱ्यावर जमा झाला.

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांत बधवार पार्क १८, दादर १५.१६, वर्सोवा ९२.६८, जुहू १५.४३, मढ ८.३५, गोराई ४.५१ मेट्रिक टन कचरा जमा झाला. गिरगाव चौपाटीवर मात्र कचरा वाहून आला नसल्याचे सांगण्यात आले. इतर ठिकाणी आलेल्या कचऱ्यामुळे चौपाट्यांवर कचऱ्याचा गालिचा तयार झाला होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत हे कचरा उचलण्याचे काम सुरु होते, अशी माहिती उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली.

पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या भरतीचे वेळापत्रक लक्षात घेऊन पालिकेच्या घनकचरा विभागाचे सफाई कामगार तैनात करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत सुमारे १५४.१२ टनापेक्षा जास्त कचरा गोळा केला आहे. वाहून आलेला कचरा त्वरित उचलून किनारपट्ट्या स्वच्छ करण्यात येत असून पर्यटकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे.

- महेश मालंडकर, घनकचरा विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT