मुंबई

मिस इंडिया ते UPSC टॉपर, रातोरात प्रकाश झोतात आलेल्या ऐश्वर्याने का घेतली पोलिसात धाव ?

अनिश पाटील

मुंबई : मॉडलींग ते नागरी सेवा परिक्षेतील टॉपर असा धक्क प्रवास करून  रातोरात प्रकाश झोतात आलेली आर्मीतील कर्नलची मुलगी २३ वर्षीय ऐश्वर्या अजयकुमार श्योराण हिच्या नावाने 16 बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी ऐश्वर्याच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार तिने आतापर्यंत कधी इन्स्टाग्राम खाते तयारच केलेले नाही.

ऐश्वर्या तिच्या कुटुंबियांसोबत कुलाब्यातील आर्मी अधिकारी वसाहतीत राहते. 2016 मध्ये फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणा-या ऐश्वर्याने 2019 च्या युपीएससी परिक्षेत देशात 93 क्रमांक मिळवला. पाच ऑगस्टला काही पत्रकारांनी तिची मुलाखत घेतली. त्यानंतर ऑनलाईन मुलाखत जारी करण्यात आली. त्यावेळी तिच्या कोणत्या इन्स्टाग्राम अकाउंटसोबत या बातम्या टॅग कराव्यात असे तिला विचारण्यात आले. त्यावेळी तिने आपले कोणतेही इन्स्टाग्राम अकाउंट नसल्याचे तिने सांगितले.  त्यावेळी तिने भावाला स्वतःच्या नावाचे किती ऑनलाईन इन्स्टाग्राम अकाउंट आहेत. हे तपासण्यास सांगितले. त्यावेळी त्याला ऐश्वर्याच्या नावाने 16 इन्स्टाग्राम खाती असल्याचे निष्पन्न झाले. त्या सर्व खात्यांमध्ये तिचे छायाचित्र आणि व्हिडिओ तिच्या परवानगीशिवाय वापरण्यात आले आहेत. या सर्व खात्यांमध्ये तिचे अधिकृत खाते असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यावर अनेक जण जोडले गेले आहेत.

एका इन्स्टाग्राम खात्याचे तर 27 हजार फॉलोअर्स आहेत. याबाबत तिने कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओळख चोरल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान गैरवापर कलम 66(क) अंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

16 fake instagram accounts with the name of aishwarya sheoran reached colaba police station

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT