Malad 
मुंबई

Mumbai Rains : मालाडमध्ये भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील मालाड पूर्व येथील कुरार गावाजवळ येथे सोमवारी मध्यरात्री सिमाभींत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बचावकार्य अद्याप सुरु असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे.

मालाड पूर्व येथील पिंपरीपाडा कुरार गावाजवळील वनखात्याची संरक्षण भिंत कोसळली. टेकडीवर बांधलेल्या काही झोपडपट्ट्यांवर ही भिंत कोसळली. यामध्ये 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य काही जण या ढिगाऱ्याखाली अडकले असून, एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता छोटा असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. पाणी जाण्यास जागा न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

सरकारने मालाडमध्ये मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना जोगेश्वरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याणमध्येही शाळेची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अऩेक भागात भिंती कोसळण्याच्या घटना पाहायला मिळत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT