nalasoprara
nalasoprara 
मुंबई

नालासोपाऱ्यात घृणास्पद प्रकार, विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

विजय गायकवाड

नालासोपारा : नालासोपारा पश्‍चिमेकडील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या 18 वर्षाच्या विवाहित महिलेवर 3 जणांनी तिच्या राहत्या घरातच सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पीडित महिलेच्या पतीला ही मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 14) रात्री 10 च्या सुमारास नालासोपारा पोलिस ठाण्यात यासंबंधित गुन्हा दाखल झाला असून या घटनेतील 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

इस्तीयाक रहमत अली शेख उर्फ समीर (वय 39), सिद्धेश विलास पेडंनकर (वय 32), मोहम्मद ईशाद ईश्रफली शेख (वय 29) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून हे तिघेही नालासोपारा परिसरातील राहणारे आहेत. 18 वर्षांची महिला नालासोपारा पश्‍चिमेकडील एका झोपडपट्टीत आपल्या पतीसोबत राहत आहे. 12 ऑगस्ट रोजी पीडित महिला घरी असताना या तीन आरोपीनी तिच्या घरी जाऊन तिच्यावर आळीपाळीने जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला आहे. त्यानंतर पीडित महिला व तिच्या पतीला बाजूला असलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या दिशेला नेऊन त्याठिकाणी पीडितेच्या पतीला लाथाबुक्‍यांनी मारहाण केली असल्याचे पीडितेच्या तक्रारीत म्हटले आहे.

शुक्रवारी पीडित महिलेने नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारतीय दंड विधांसाहिता कलम 376 (ड), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

18 year old married women torture by 3 men in nalasopara

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT