19-year-old Brazilian student rape case cops filed a supplementary chargesheet reveal Spanish student case
19-year-old Brazilian student rape case cops filed a supplementary chargesheet reveal Spanish student case  esakal
मुंबई

Brazilian Rape Case : ब्राझिलियन विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरणात मोठा खुलासा; एका स्पॅनिश…

रोहित कणसे

मुंबई : एक्स्चेंज स्टुडंट म्हणून 2019 मध्ये भारतात आलेल्या एका 19 वर्षीय ब्राझिलियन विद्यार्थिनीवर पेयात गुंगींच औषध मिसळून बलात्कार केल्याच्या प्रकरणात चार वर्षांनंतर पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात एका स्पॅनिश महिलेच्या प्रकरणाचा देखील समावेश करण्यात आले आहे.

या आरोपपत्रात, 2014 मध्ये त्याच घरात राहणाऱ्या एका स्पॅनिश विद्यार्थिनीने देखील तिच्यासोबत घडलेला आपबीती सांगितली आहे. रेबेका समरवेल नावाच्या महिलेने सांगितलं की, कशा प्रकारे जेव्हा ती आजारी असताना आरोपी तिच्या पलंगावर चढला आणि ती पळून जावून बाथरूममध्ये लपण्यापूर्वी त्याने तिला स्पर्श देखील केला.

दरम्यान असा आरोप करण्यात उशीर झाल्याचे कारण देत आरोपीने आता पुरवणी आरोपपत्राच्या मान्यतेला आव्हान दिले आहे. तसेच या खटल्यातून मुक्ताता होण्यासाठी त्यांने अर्जही दाखल केला आहे.

2019 मधील या बलात्कार प्रकरणातील आरोपीने शहर पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राला विरोध केला आहे. यादरम्यान पीडीतेने या प्रकरणात आरोपपत्र स्वीकारण्यासाठी तसेच आरोपीने घेतलेल्या आक्षेपांवर वकीलांमार्फत सादर केलेले उत्तर 14 जून रोजी सुनावणीसाठी येणार आहे.

प्रकरण काय आहे?

भारतात वर्षभराच्या युथ एक्सचेंज प्रोग्रामवर असलेल्या महिलेने 20 मे 2019 रोजी 56 वर्षीय व्यक्तीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. हा प्रोग्राम एका क्लबद्वारे आयोजित करण्यात आला होता ज्याचा तो व्यक्ती भाग होता होता. त्या व्यक्तीने मुलीला आपल्या घरी ठेवले होते, जिथे ती सहा महिने त्याच्या कुटुंबासह राहिली होती. ज्या दिवशी आरोप दाखल करण्यात आले त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आले आणि ऑगस्ट 2019 मध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान पीडीतेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, स्पॅनिश नागरिक असलेल्या या महिलेने 2019 मध्ये तपास अधिकारी आणि आरोपी ज्या क्लबचा सदस्य होता त्यांना ईमेल पाठवला होता. ईमेलमध्ये महिलेने सांगितले की, त्या वेळी या घटनेबद्दल बोलण्यास ती खूप घाबरली होती; तिने शेवटी एका मैत्रिणीला घडलेली हकीकत सांगितली.

तसेच पीडितेच्या जबाबात म्हटले आहे की याप्रकरणी तपास अधिकाऱ्याने ऑक्टोबर 2019 मध्ये आरोपपत्र दाखल केले. आरोपीने दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला ज्यामध्ये त्याने अपूर्ण आरोपपत्र जोडले. तसेच आरोपीने जाणूनबुजून मध्यस्थी (पीडित) आणि तिच्या मित्रामधील व्हॉट्सअॅप चॅटचे इंग्रजी भाषांतर जोडले नाही... जे या...न्यायालयाच्या रेकॉर्ड आणि कार्यवाहीचा भाग आहे.

पीडीतेने म्हटलं आहे की, हे टेक्स्ट संदेश आणि व्हॉइस मेसेज दडपल्यामुळे आरोपीला जामीन मिळाला आणि आता तो ही वस्तुस्थिती लपवून सुटकेची मागणी करत आहे आहे. तसचे कोविड-19 साथीमुळे तपासात झालेल्या विलंबाचाही उल्लेख यावेळी करण्यात आला आहे.

दरम्यान 2019 मध्ये आरोपीला जामीन मंजूर करताना, सत्र न्यायालयाने सांगितले होते की घटनेनंतर पीडितेचे वर्तन - आरोपी आणि त्याच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात राहणे - या घटनेमुळे तिला दुखापत झाली किंवा भीती वाटली ही शक्यता वगळण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT