19-year-old woman died in premature labor along with her baby in Vikramgad Palghar  sakal
मुंबई

पालघरच्या व्यथा! उपचारादरम्यान १९ वर्षीय महिलेचा बाळासह मृत्यू

पालघरमध्येच मागच्या महिनाभरापूर्वी गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील अतिदुर्गम अशा सावरोली गावातील एका १९ वर्षे महिलेचा आणि तिच्या बाळाचा सातव्या महिन्यात प्रसूतीदरम्यान प्रकृती खालावल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर स्थानिकांकडून आरोग्य विभागाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विक्रमगड तालुक्यातील सावरोली गावातील तनुजा तुषार पारधी (वय वर्षे 19) या महिलेचा सातव्या महिन्यात 6 सप्टेंबर च्या रात्री आठ वाजता घरीच प्रसूती झाली. मात्र वेळेआधी जन्माला आलेल्या बाळाचा मृत्यू झाला तिला तात्काळ उपचार करण्यासाठी नातेवाईकांनी महिलेस दवाखान्यात दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्यांना दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तो पर्यंत बराच उशीर झाला होता. ज्या वेळी महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले, तेव्हा तिची प्रकृती अधिकच नाजूक होती. घरच्यांनी तिच्या छातीत दुखत असून तिला श्वास घ्यायला त्रास होतो असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले.

वाडा ग्रामीण रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वप्नील राऊत व वाडा प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनील भडांगे यांनी दिलेल्या माहिती नुसार, महिलेला ज्या वेळी दाखल करण्यात आली तेव्हा तिची प्रकृती नाजूक होती. तिचा बी.पी. लो झालेला होता. तसेच नाडी (हाताच्या प्लस मिळत नव्हत्या) आम्ही आमच्या परीने सर्व उपचार केले मात्र तिने उपचाराला प्रतिसाद दिला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

महिलेची घरीच प्रसूती झाल्यामुळे अधिक बल्डिंग झाले असावे, त्यामुळे हृदयावर ताण येऊन तिचा संध्याकाळी वाडा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

यादरम्यान आरोग्य विभागाबाबत अनेक प्रश्न उपस्तितीत होत आहेत. आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळेच हे मृत्यू झाले असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली असून या बाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप निबांळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते डहाणू येथे मिटिंगसाठी गेल्याने ते प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत. तर प्राथमिक आरोग्य केंद्र कुंर्झे येथील डॉ.विनोद रडे यांच्या शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या माता व बाळक मृत्यू प्रकरणी आरोग्य विभाग इतकासा गंभीर नसल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT