crime esakal
मुंबई

कामाठीपुरा-नागपाड्यात एमडी ड्रग्जची तस्करी; दोघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कामाठीपुरा व नागपाडा परिसरात एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या सराईत 2 आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून (आझाद मैदान) अटक केली आहे. मुंबई पोलिस, गुन्हे शाखा, तसेच अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वतीने मुंबईत ड्रग्जची तस्करी, विक्री, तसेच सेवन करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. राज्यात निर्बंध असले तरी छुप्या मार्गाने अंमली पदार्थ येण्याचे प्रकार सुरूच आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

अब्दुल हमीद अब्दुल सत्तार पठाण, इसाक इक्बाल हुसेन सय्यद असे या दोनही आरोपींचे नाव आहे. या दोघाकडून पोलिसांनी ८० ग्रँम एमडी जप्त केले असून बाजारात या ड्रग्जची किंमत ८० लाख इतकी आहे. हे दोघंही सराईत ड्रग्ज तस्कर असून त्याच्यावर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

गुजरातच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी कारवाईला वेग

देशातील सर्वात मोठ्या हेरॉईन ड्रग्ज तस्करीपैकी एक असलेल्या गुजरातच्या मुंद्रा बंदरावरील (Mundra Port) तस्करीप्रकरणी कारवाईला वेग आलाय. जवळपास २१,००० कोटी रुपयांच्या ३,००० किलोग्रॅम हेरॉईन तस्करीप्रकरणी भूज न्यायालयाने चेन्नईतून अटक केलेल्या एका आरोपी जोडप्याला १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) दिल्लीत मंगळवारी (२१ सप्टेंबर) वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ६ आरोपींना अटक केलीय. यात काही अफगाणिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना दिल्लीत कोकेन आणि हेरॉईनसोबत अटक करण्यात आली होती. त्यांचा गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का हेही तपासलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT