मुंबई

मुंबईतील 2 हजार 230 इमारती कोविडमुक्त; प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संख्येत वाढ 

समीर सुर्वे

मुंबई : कोविडचा संसर्ग कमी होऊ लागला असून, गेल्या 14 दिवसांत 2 हजार 230 इमारती कोविडमुक्त झाल्या आहेत. मात्र प्रतिबंधित इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची संख्या 1 लाख 90 हजारने वाढली आहे. 

मुंबईतील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 200 दिवसाच्या पुढे गेला आहे. तर सर्वच प्रभागातील संसर्गाचा दरही 0.50 टक्‍क्‍यांच्या खाली आला आहे. 24 ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील 8 हजार 503 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने या इमारती सिल करण्यात आल्या होत्या. या इमारतींमध्ये 8 लाख 90 हजार नागरिक राहत होते. शुक्रवारी (ता.7) 6 हजार 273 इमारतीत कोविडचे रुग्ण असल्याने त्या इमारती सिल करण्यात आल्या आहेत; तर या इमारतींमध्ये 10 लाख 8 हजार नागरिक राहत आहेत. प्रतिबंधित इमारतींची संख्या 2 हजार 230 ने घटली आहे. मात्र या इमारतींमध्ये राहाणाऱ्या नागरिकांची संख्या तब्बल 1 लाख 90 हजारने वाढली आहे. पालिका सध्या रुग्ण आढळल्यावर पूर्ण इमारत प्रतिबंधित न करता ती विंग प्रतिबंधित करते. त्यामुळे एकाच इमारतीत वेगवेगळ्या विंगमध्ये राहणारे रुग्ण आढळू लागल्याने प्रतिबंधित इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. 

124 वस्त्या कोविडमुक्त 
मागील 14 दिवसांत 124 वस्त्या कोविडमुक्त झाल्या आहेत. 24 ऑक्‍टोबर रोजी 632 वस्त्या आणि चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आढळले होते. ती संख्या आता 509 पर्यंत खाली आली आहे. 
. -----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT