Mumbai Fire आेोकोत
मुंबई

Mumbai Fire: ओशिवरा परिसरात फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत 20 ते 25 दुकानं जळून खाक

या भीषण आगीमध्ये दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पश्चिम जवळील ओशिवरा घास कम्पाऊंडयेथील फर्निचर गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून फायर कूलिंगचे काम चालू आहे. आग आटोक्यात आली असली तरी या घटनेत 20 ते 25 फर्निचरची दुकाने जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला आज सकाळी अकराच्या सुमारास भीषण आग लागली. लाकूड गोदाम आणि फर्निचरचे शॉप असल्यामुळे क्षणातच आगीने वेग पकडला. सुदैवाने ही आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळजवळ दीड तास शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

जोगेश्वरीतील ओशिवरा येथे फर्निचरची मोठी बाजारपेठ आहे. या आगीत सकाळच्या दरम्यान लाकूड गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 12 ते 14 गाड्यां घटनास्थळी पोहोचले. तब्बल दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

मुख्य रस्त्यालगत ही घटना घडल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी आता एस व्ही रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे. या ठिकाणी असणारे दुकानदार या भीषण आगीपासून आपल्‍या दुकानातील माल वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसुन आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT