एमबीबीएस प्रवेशाच्या प्रलोभनाने २० तरुणांची फसवणूक 
मुंबई

एमबीबीएस प्रवेशाच्या प्रलोभनाने २० तरुणांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या प्रलोभनाने तिघांनी २० तरुणांकडून तब्बल ५७ लाख ५० हजार रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. विवेक कौशिक, विवेक तिवारी व मनीष रावत अशी या तिघांची नावे असून, नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या तिघांविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या तिघा आरोपींनी एपीएमसी सेक्‍टर-१९ डीमधील एम्बियन्स कोर्ट इमारतीमध्ये एस्पायर स्टडी इंडिया नावाचे कार्यालय थाटले होते. जाहिरातबाजीला भुलून गेल्या ऑगस्ट महिन्यात एमबीबीएसचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणांनी त्यांच्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली होती. अनेक विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी सुरुवातीची तीन लाख रुपयांची रक्कम चेकद्वारे व रोख स्वरूपात त्यांना दिली. त्यानंतर या तिघा संबंधित विद्यार्थ्यांना राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांची नावे सांगून, प्रवेशाच्या प्रलोभनाने त्या त्या महाविद्यालयात बोलावून घेतले; मात्र, या तिघांचा त्यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे आढळून आले. त्यामुळे फसवणूक झालेल्या २० विद्यार्थ्यांनी पोलिस तक्रार दाखल केली.

धक्कादायक! पैसे परत केले नाही म्हणून एअर इंडियाच्या अभियंत्यावर ओढवली ‘ही’ वेळ

१० लाखाची मागणी
एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साडेचार वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे तसेच प्रत्येक वर्षासाठी १० लाख रुपये खर्च येणार असल्याचे या तिघांनी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना सांगितले होते. त्यातील तीन लाख रुपये एस्पायर स्टडी इंडियाला चेकद्वारे; तर वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी पाच लाख ६५ हजार रुपये कॉलेजच्या नावाने डीडी काढून संबंधित कॉलेजला; तर उर्वरित एक लाख ३५ हजार रुपये एस्पायर स्टडी इंडियाला द्यावे लागतील असे सांगण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT