Prasad Purohit_Malegaon Blast 2008 
मुंबई

Malegaon Blast: "ले. कर्नल पुरोहितनं 'अभिनव भारत'च्या बैठकांना हजेरी लावली, कर्तव्य बजावलं नाही"; हायकोर्टाचा झटका

पुरोहित मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक आहे.

सकाळ डिजिटल टीम

2008 Malegaon Blast Case: मालेगाव स्फोटप्रकरणातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितनं आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळं पुरोहितसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. (2008 Malegaon Blast Case Bombay HC dismisses Lt Col Prasad Purohit discharge application)

मालेगाव स्फोटप्रकरणी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं (NIA) पुरोहितविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी त्यानं हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. एनआयएच्या आरोपानुसार, हायकोर्टाच्या विभागीय खंडपीठानं यावर निरीक्षण नोंदवताना म्हटलं की, "लेफ्टनंट कर्नल पुरोहित अभिनव भारत संघटनेच्या बैठकांना जात असताना भारतीय सैन्यातील अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत नव्हते"

पुरोहितनं अपिलाच्या सुनावणीवेळी युक्तिवाद केला की, "बॉम्बस्फोट प्रकरणात त्याच्यावर खटला चालवण्यासाठी एनाआयएनं भारतीय सैन्याकडून CrPC च्या कलम 197(2) अंतर्गत मंजुरी घेण्यात आली नव्हती. त्यामुळं आपल्यावरील आरोप निश्चिती वैध नाही. पुरोहितच्या या युक्तीवादावर एनआयएनं उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

एनआयएनं म्हटलं की, "लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितवर खटला चालवण्याची परवानगी आवश्यक नव्हती कारण ते अभिनव भारतच्या बैठकांना उपस्थित असताना आपलं कर्तव्य बजावत नव्हते" यानंतर हायकोर्टानं एनआयएचा युक्तिवाद ग्राह्य धरून पुरोहितचं अपील फेटाळून लावलं. हायकोर्टाचे न्या. ए. एस. गडकरी आणि न्या. प्रकाश डी. नाईक यांनी आज हे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT