मुंबई

काय बोलता! 22 हजार वर्षांपूर्वीच्या मानवालाही कोरोनाचा फटका, कोकणातल्या अश्मयुगीन संस्कृतीचे संशोधन मंदावले

समीर सुर्वे

मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सर्वच जण या व्हायरसचा सामना करताहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतानाच दिसत आहे. या संकटातून आतापर्यंत कोणीच सुटू शकलं नाहीय. त्यातच एक वेगळी बातमी समोर आली. आतापर्यंत आपण या कोरोना व्हायरसची लागण मानव जातीला झालेली पाहिली आहे.  मात्र कोविडचा त्रास फक्त सांप्रत मानवजातीला सोसावा लागत नसून 22 हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीलाही याचा फटका बसला आहे. कोकणातील अश्मयुगीन संस्कृतीच्या संशोधनावर कोविडचा परिणाम झाला आहे. या काळात संशोधनाचं काम धिम्मं झाल्याचं चित्र आहे. यासोबतच गड किल्ल्यांसह काही ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धानाच्या कामातही अडचणी येण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  मालवण येथील कोळोशी गावात दोन वर्षांपूर्वी एका गुहेत अश्मयुगीन मानवाच्या खुणा आढळल्या होत्या. या ठिकाणी संशोधन, उत्खनन केल्यावर तेथे शेकडो दगडी अवजारांचे अवशेष आढळून आले होते. ही संस्कृती साधारण इसवी सनपूर्व 20 हजार वर्षापूर्वींची असू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. मात्र, येथील संशोधन कामाला कोविडचा फटका बसला आहे. 

पावसाळ्यात उत्खनन होत नसले तरी रेकॉर्ड तयार करण्यासारखी कामे होतात. मात्र, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना कोविड ड्यूटी लावण्यात आली आहे. मात्र, तरीही हे अधिकारी वेळेचे नियोजन करुन संशोधनाबाबत कामे करत आहेत. तरीही कामावर याचा निश्चितच परिणाम झाल्याचं म्हणता येईल, असे पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.

कोविडचा परिणाम फक्त संशोधनावर होणार नसून संवर्धनावरही होण्याची शक्यता आहे. संशोधन आणि संवर्धनासाठी 24 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मिळतो. यंदा हा निधी 30 कोटींपर्यंत वाढविण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे सरकारी उत्पन्नात घट झाल्याने निधी कमी मिळण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाकडे कर्मचारी आणि संशोधकांची कमतरता असल्याने प्रकल्पानूसार तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. कोविडमुळे या नियुक्तीती अडचणी येऊ शकतात, असे एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

  • लॉकडाऊनचा चांगलाही परिणाम

लॉकडाऊनचा चांगला परिणामही झाला असल्याचे डॉ.गर्गे सांगतात. यामुळे विभागाचे संकेतस्थळ तयार करणे, वस्तूसंग्रहालयाचे अॅप्लिकेशन तयार करणे, जुनं डॉक्युमेंटशन करणे, अशी कामे सुरु असल्याचे सांगण्यात आले. नियमित वेळेत अशा कामांना फारसा वेळ मिळत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

  • असा लागला गुहेचा शोध

90 च्या दशकापासून कोकणात काताळशिल्प सापडण्याची सुरुवात झाली. या काताळशिल्पांचा शोध घेत असताना या गुहेचा शोध लागला. या गुहेचा आणि काताळशिल्पांचा निश्चितच संबंध असू शकेल, असेही डॉ.गर्गे यांनी सांगितले. यातील काही शिल्प दगडी अवजारांनी तर काही लोखंडी अवजारांनी कोरली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणच्या पुरातन इतिहासाला नवी दिशाही मिळण्याची शक्यता आहे. 

  • काताळशिल्पांच्या संवर्धनासाठी 6 कोटी

काताळशिल्पांच्या संवर्धनासाठी यंदा 6 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा निधी यंदा नाही मिळाला तरी, पुढील वर्षी मिळू शकेल.

संपादनः पूजा विचारे 

22 thousand year old human being hit by corona slows down research fossil culture Konkan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT