मुंबई

बनावट शॉपिंग संकेतस्थळाद्वारे 22 हजार नागरिकांची फसवणूक; लंडनमधून शिक्षण घेतलेला आरोपी अटकेत 

अनिश पाटील

मुंबई  बनावट शॉपिंग संकेतस्थळाद्वारे देशभरातील 22 हजार नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीने बहुसंख्य महिलांची फसवणूक केली आहे. 

आशीष अहिर (वय 32) असे अटक मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याने लंडनमधून आयटीचे शिक्षण घेतले आहे. आरोपीला गुजरातमधून अटक केली असून, पोलिसांनी अशा आणखी 11 बनावट संकेतस्थळांची ओळख पटवली आहे. shopiiee.com या संकेतस्थळाबाबत पोलिसांना अनेक तक्रारी आल्या होत्या. याबाबत करण्यात आलेल्या सखोल तपासात आरोपींनी 22 हजार व्यक्तींची 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या संकेतस्थळांद्वारे महिलांचे कपडे, खोटे दागिने, घरगुती वस्तूंची विक्री करण्यात येत होती. फेसबुकच्या साह्याने त्याची जाहिरातही करण्यात येत होती. तपासानंतर आरोपी सूरतमधून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला अटक करून मुंबईत आणण्यात आले. संकेतस्थळांबाबत अनेक तक्रारी पोलिसांना आल्या होत्या. याप्रकरणी त्याच्या सहकाऱ्यांचीही ओळख पटली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

फसवणूक होणारी संकेतस्थळे 
 

  • https://white-stones.in/,

  • https://jollyfashion.in/,

  • https://fabricmaniaa.com/,

  • https://takesaree.com/,

  • https://www.assuredkart.in,

  • https://republicsaleoffers.myshopify.com/,

  • https://fabricwibes.com/, https://efinancetix.com/,

  • https://www.thefabricshome.com/,

  • https://thermoclassic.site/,

  • https://kasmira.in/ 

22,000 citizens deceived by fake shopping websites London educated accused arrested

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT