मुंबई

केंद्रीय कोट्यातील MBBSच्या 222 जागा पुन्हा राज्याच्या कोट्यात वर्ग; राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा

तेजस वाघमारे

मुंबई  :  राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या केंद्रीय कोट्यातील 222 जागा दुसऱ्या प्रवेश फेरीनंतरही रिक्त राहिल्याने या जागा पुन्हा राज्याच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील काही विद्यार्थ्यांचे एमबीबीएसचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीनंतर बहुतांश सरकारी तसेच पालिका रुग्णालयातील बहुतांश जागांवर प्रवेश झाले आहेत. परंतु केंद्रीय कोट्यातील जागा रिक्त राहिल्याने केंद्राकडून राज्यांना 2098 जागा पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 222 एमबीबीएसच्या आणि 40 दंतवैद्यकच्या जागा राज्याकडे पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत. केंद्रीय कोट्यातून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे या जागा रिक्त राहिल्याने त्या पुन्हा राज्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यात वर्ग करण्यात आलेल्या 222 जागांपैकी 59 जागा या मुंबई व ठाण्यातील महाविद्यालयातील आहेत. यातील 20 जागा कूपर रुग्णालय, 13 लोकमान्य टिळक रुग्णालय आणि 12 नायर रुग्णालाशी जोडलेल्या महाविद्यालयात आहेत.

222 seats of MBBS in central quota again class in state quota

------------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची तब्येत बिघडली; लीलावती इस्पितळात दाखल; वडिलांच्या काळजीने भाईजानची इस्पितळात धाव

Eknath Shinde: पहलगाममध्ये मृत्युमुखी जगदाळेंच्या मुलीस सेवेत घ्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे महापालिकेस निर्देश!

Satara Crime: फलटणमधील दोघे तडीपार; सातारा पोलिस अधीक्षकांची कारवाई, विविध ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल!

T20 World Cup: कॅनडाच्या युवराजचा विश्वविक्रम! ११ चौकार, ६ षटकार अन् न्यूझीलंडविरुद्ध शतक, सुरेश रैनाचाही रेकॉर्ड मोडला

Egyptian Treasure Theft : 3300 वर्षे जुना हार अन् अडीच हजार वर्षांपूर्वीची मांजरीची मूर्ती..; चोरीला गेलेला इजिप्शियन मौल्यवान साठा जप्त

SCROLL FOR NEXT