रायगडमधील समुद्र किनारा
रायगडमधील समुद्र किनारा 
मुंबई

मंदीतही वर्षाअखेरीस पर्यटनाला संधी 

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग ः लांबलेला पाऊस आणि मंदीचे सावट यामुळे यंदा उशिराने सुरू झालेला रायगडमधील पर्यटन व्यवसाय आता मळवट बाजूला सारत वर्षअखेरच्या तयारीला लागला आहे. विशेष म्हणजे नाताळची सुट्टी आणि "थर्टीफस्ट सेलिब्रेशन'ला एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी असताना निवास व्यवस्थेच्या आरक्षणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हॉटेल, लॉज व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 40 टक्के आरक्षण झाले आहे. 

जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन अशी एकापेक्षा एक सरस पर्यटनस्थळे आहेत. त्यांना मुंबई, पुण्यातील पर्यटकांची पसंती आहे; परंतु यंदा मंदी आणि लांबलेल्या पावसामुळे या व्यवसायाला अवकळा आली होती. ती आता वर्षाअखेर साजरा करणाऱ्या उत्साहींमुळे सरण्याची चिन्हे दिसत आहेत. 
अनेक पर्यटकांनी हॉटेल व्यावसायिकांकडे मोबाईलद्वारे, वेबसाईटद्वारे डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातील आगाऊ आरक्षणाची चौकशी सुरू केली आहे. 

दिवेआगर, मुरूड, अलिबाग, माथेरान, किहिम या ठिकाणच्या हॉटेल व्यावसायिकांनी त्याला दुजोरा दिला आहे. वर्षाचा शेवटचा दिवस मंगळवारी आहे. त्यामुळे अनेक जण सोमवारची सुट्टी टाकून सलग तीन दिवसांच्या पर्यटनाचा बेत आखत आहेत; तर अनेकांना ही सुट्टी मिळणे शक्‍य नसल्याने एका दिवसात परत जाणाऱ्या सहलीची आखणी केली आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पुढाकार घेत पर्यटन महोत्सवाचे नियोजन सुरू केले आहे. 

अलिबाग पालिकेच्या वतीने 26 डिसेंबरला पर्यटन महोत्सव होणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. 
- प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग नगरपालिका 
 
या वर्षी पर्यटन हंगाम उशिरानेच सुरू झाला असला, तरी वेबसाईटवरून मिळत असलेल्या प्रतिसादावरून उत्साह वाढत आहे. नाताळपासून पर्यटक येण्यास सुरुवात होणार आहे. आतापर्यंत साधारण 40 टक्के बुकिंग झाले आहे. 
- सागर पाटील, श्रीहरी कॉटेज 

मुरूड पालिकेने पर्यटन महोत्सवात कधी खंड पाडला नाही. या वर्षीही पर्यटकांच्या स्वागतासाठी 28 ते 31 डिसेंबरपर्यंत महोत्सव होणार आहे. यातून येथील पर्यटन उद्योगाला वेग येणार आहे. 
- स्नेहा पाटील, नगराध्यक्षा, मुरूड पालिका 

वर्षाअखेरीस 10 दिवस चांगला व्यवसाय होतो. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक चांगले "पॅकेज' देऊन दर वाढविण्याचा प्रयत्न करतात. यंदाही वेगवेगळे "पॅकेज' आहेत. 
- सदानंद म्हात्रे, स्नेहप्रभा हॉटेल, मुरूड 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT