Mucormycosis Esakal
मुंबई

नायर रुग्णालयात म्युकोरमायकोसिसवर उपचार; बेड्सची केली सोय

म्युकोरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत कोरोना (corona) रुग्णांच्या संख्येत घट होत असतांना आता म्युकोरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत मात्र वाढ होतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत (mumbai) म्युकोरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या १५० वर होती. या संख्येत आता वाढ झाली असून ती २३७ वर पोहोचली आहे. मात्र, मुंबईतील नायर रुग्णालयात म्युकोरमायकोसिस रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असून ४५ नव्या बेडची सोय करण्यात आली आहे. (237-cases-of-mucormycosis-reported-in-mumbai)

नायरमध्ये ४५ बेड्सची सुविधा -

म्युकोरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांसाठी पालिकेच्या केईएम, नायर आणि सायन या तिन्ही रुग्णालयांमध्ये बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नायर रुग्णालयात एकूण ४५ बेड्स कोविड आणि नॉन कोविड म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांसाठी ठेवण्यात आले असून ४० रुग्ण उपचार घेत आहेत. ही संख्या वाढत असून आणखी बेडची सुविधा केली जाणार आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात सर्वाधिक एकूण ६२ म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद ठेवण्याचे आणि त्याचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी केईएम रुग्णालय प्रशासनाकडे असून हा अहवाल तयार केला जात आहे. त्यात खासगी आणि पालिका रुग्णालयात म्युकोरमायकोसिसवर उपचार घेणार्‍या रुग्णांची नोंद केली जात आहे. त्यानुसार, मुंबईत २३७ रुग्ण आहेत. खासगी रुग्णालयांनीही आता माहिती देणे सुरू केले आहे , असेही डॉ. देशमुख यांनी साांगितले.

खासगी रुग्णालयात ९० रुग्णांवर उपचार -

एकूण २३७ रुग्णांपैकी ९० रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, १८ रुग्ण सरकारी रुग्णालयात दाखल असून ६२ रुग्ण केईएम, नायर मध्ये ४० आणि सायनमध्ये २७ रुग्ण दाखल असून उपचार घेत आहेत.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT