मुंबई

मुंबईतील 4 प्रभागांमध्येच कोव्हिडचे 25 टक्के मृत्यू; सर्वात कमी मृत्यू हे फोर्ट कुलाबा परिसरात

समीर सुर्वे

मुंबई : कोविड मुळे झालेल्या मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे चार प्रभागात आहेत. सर्वाधिक मृत्यू हे अंधेरी जोगेश्‍वरी पुर्व के पुर्व प्रभागात 666 आहेत. तर, सर्वात कमी मृत्यू हे फोर्ट कुलाबा ए प्रभागात 93 एवढे आहेत. अशी माहिती मुंबई महानगर पालिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागाने जाहीर केली आहे.

मुंबईत 21 ऑक्‍टोबर पर्यंत कोविड मुळे 9 हजार 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यातील सर्वाधिक मृत्यू हे के पुर्वसह जी दादर माहिम धारावी, विक्रोळी भांडूप एस, घाटकोपर एन या प्रभागात 500 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.या चार प्रभागात एकूण मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू झाले आहेत. मुंबईत महानगर पालिकेचे 24 प्रशासकीय प्रभाग आहेत. पुर्व उपनगरात मृत्यूंचे प्रमाण हे शहरातील इतर भागांच्या तुलनेने जास्त आहे.
संपुर्ण मुंबईचा विचार केल्यास दक्षिण मुंबईत मृत्यूंचे प्रमाण सर्वात कमी आहे. दक्षिण मुंबईतील ए,बी,सी या प्रभागात मृत्यूंचे प्रमाण सर्वात कमी आहे. तर,वांद्रे,सांताक्रुझ पश्‍चिम या प्रभागातही मृत्यूंचे प्रभाण कमी आहे. मुंबईतील सप्टेंबर ऑक्‍टोबर मृत्यू रोखण्यात महानगर पालिकेला यश आल्याचा दावा केला जात आहे.या एक महिन्याच्या दरम्यान मृत्यूदर हा 2 ते 3 टक्‍क्‍यां दरम्यान आहे.

सर्वाधिक मृत्यू असलेले विभाग
प्रभाग - मृत्यू - एकूण रुग्ण
के पुर्व - 666---14262
जी उत्तर - 592--12235
एस - 575---11814
एन - 512---11637

सर्वात कमी मृत्यू असलेले चार विभाग
प्रभाग - मृत्यू - एकूण रुग्ण
ए - 93--5816
बी -115---1885
सी -135--3418
एच पश्‍चिम - 251--8214

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT