अशा बाईक खरेदी करण्यात येणार आहेत. 
मुंबई

मुंबईत 24 फायर बाईक; अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळवणार

समीर सुर्वे

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच 24 फायर बाईक दाखल होणार आहेत. त्यासाठी पालिकेकडून निविदा मागवण्यात आली आहे. 

महापालिकेने या वर्षाच्या सुरुवातीला फायर बाईक विकत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊनमुळे परिवहन विभागाच्या परवान्यामुळे ही खरेदी रखडली होती. सुरुवातीला फक्त दुचाकी पासिंग करून, नंतर त्यामध्ये फायर बाईक म्हणून सुधारणा करण्यात येणार होती. मात्र आता या दुचाकीची नोंदणी फायर बाईक म्हणूनच करण्यात येणार आहे. यास परिवहन विभागाने तत्त्वता मंजुरी दिली आहे, असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

मुंबईतील वाहतूक कोंडी आणि चिंचोळ्या गल्लीबोळातून ही फायर बाईक वेगाने घटनास्थळी पोहचू शकेल. प्रथम प्रतिसाद म्हणून या वाहनांचा वापर होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

प्रत्येक प्रशासकीय विभागात एक फायर बाईक या प्रमाणे 24 दुचाकींची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागण्यात आल्या असून, या महिन्याच्या अखेरीस या निविदा उघडणार आहेत. आपत्तीत प्रथम प्रतिसाद महत्त्वाचा असतो. वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात येईल. त्यामुळे दुर्घटनेवर वेळीच नियंत्रण मिळवण्याचे प्रमाण वाढेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळ 
फायर बाईकची किंमत 13 लाखांपर्यंत असेल. त्याचा सर्वाधिक फायदा वर्दळीच्या वेळी वाहतूक कोंडीतून आगीच्या घटनास्थळापर्यंत पोहचण्यासाठी होईल. तसेच झोपडपट्ट्या आणि गल्लीबोळातील घटनास्थळापर्यंतही पोहचणे शक्‍य होईल. अग्निशमन दलाचा शहर विभागात "रिस्पॉन्स टाईम' 10 ते 15 मिनिटांचा आहे. तर पश्‍चिम उपनगरात 15 ते 20 मिनिटांचा वर्दळीच्या वेळी आहे. या मोटारसायकलमुळे ही वेळ कमी होईल. 
 
अशी असेल फायर बाईक 

- 40 लिटर पाण्याची टाकी असेल. 
- पाईपातून 100 फुटांपर्यंत पाणी मारता येईल. 
- मिनिटाला आठ लिटर पाण्याचा फवारा मारता येईल. 
- जीपीएस सिस्टम बसवलेली असेल. त्यातून अग्निशमन केंद्राला घटनास्थळी अचूक पोहोचण्यास मदत मिळेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT