वीज 
मुंबई

शिरोळमध्ये आदिवासी पाड्यावर वीज कोसळून 25 जखमी; नागरिकांमध्ये घबराट

नरेंद्र जाधव

खर्डी ः गेल्या दहा दिवसांपासून शहापूर तालुक्‍यात परतीचा पाऊस सुरू आहे. बुधवारी (ता.20) खर्डीजवळील शिरोळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फणसपाडा या आदिवासी वस्तीतील भिका भाऊ थोराड यांच्या घरावर रात्री 7.30 च्या दरम्यान वीज कोसळून घरातील व परिसरातील 25 रहिवाशी जखमी झाले आहेत. आज जखमींची शहापूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली. 


या विजेमुळे घरावरील वासे जळून गेले असून कुठलीही जीवितहानी झाली नाही. जखमी झालेल्या जया थोराड, भरत थोराड, रंजना व्हाले, सनी थोराड, शिड्या थोराड, सुनीत थोरड, पायल पारधी, भरत घाणे, सविता पारधी, जानू मेंगाळ यांना उपचारासाठी शहापूरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; तर आणखी तिघांवर खर्डी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे माहिती खर्डी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन पाटील यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच रात्री 10 वाजता शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय निमसे, जि.प. सदस्य विठ्ठल भगत, शिरोळचे उपसरपंच सचिन निचिते, सेनेचे तालुका संपर्कप्रमुख गणेश राऊत, प्रशांत खर्डीकर यांनी खर्डी येथील दवाखान्यात जखमींची भेट घेऊन त्यांना आधार दिला. 

25 injurd in lightning strike

(संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजय दिना पाटील शिंदेंच्या संपर्कात, हे उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, मनसेनच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update: वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवारपासून पूर्णपणे बंद

Ausa News : औसा पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी डॉ. अफसर शेख

SSC Exam Result : स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी परीक्षेत राज्यात प्रथम

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

SCROLL FOR NEXT