Gold sakal
मुंबई

Gold Seized : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.5 किलो सोने जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने केलेल्या कारवाईत 1.17 कोटी रुपयांच्या सुमारे अडीच किलो सोने जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने केलेल्या कारवाईत 1.17 कोटी रुपयांच्या सुमारे अडीच किलो सोने जप्त केले.

मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने केलेल्या कारवाईत 1.17 कोटी रुपयांच्या सुमारे अडीच किलो सोने जप्त केले आहे. सोन्याच्या तस्करी केल्याप्रकरणी मुंबईतील रहिवाशाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सुफियान वाघू असे आरोपीचे नाव असून तो दक्षिण मुंबईतील सात रस्ता परिसरामधील रहिवासी आहे. आरोपीवर सीमा शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटला मिळालेल्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत, बुधवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेद्दाहून आलेल्या आरोपीची तपासणी केली. तपासणी दरम्यान आरोपींकडे सोन्याचा ऐवज आढळून आले. अधिकाऱ्यांनी आरोपीला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीदरम्यान जेद्दाहमधील एका व्यक्तीने त्याला सोने असलेले पॅकेट मुंबईतील एका व्यक्तीला देण्यासाठी दिले होते, ज्यासाठी त्याला 15000 रुपये मिळणार असल्याची आरोपीने अधिकाऱ्यांना माहिती दिली. मुंबईत कोणत्या व्यक्तींकडे हे पार्सल पोहोचवायचे होते याचा तपास अधिकारी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT