250 new Tata buses in MSRTC ST mumbai sakal
मुंबई

Mumbai News : एसटीच्या ताफ्यात लवकरच टाटाच्या २५० नवीन बसेस

चेसीस स्विकारण्याच्या नियोजनासाठी महामंडळाने बोलवली तातडीची बैठक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळात नव्याने टाटा मोटर्सचे २५० चेसीस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी तातडीची बैठक बोलवण्यात आली असून, त्यामध्ये १२ मीटर लांबी असलेल्या २०० निमआराम आणि ५० शयनयान बसेसचे चेसिस खरेदी केल्यास लवकरच या बसेस एसटीच्या ताफ्यात सेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे.

महामंडळाने यापुर्वीच १२ मिटर लांबीच्या २५० चेसीस खरेदीचे आदेश दिलेला होते. त्यावर बाहेरील बस बाँडी बांधणीकारांकडून बांधणीचे काम महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत करण्याचे नियोजन केले होते. मात्र, एसटी महामंडळाच्या सध्या स्थितीनुसार या नियोजनात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामूळे महामंडळाने मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात तातडीची बैठक बोलवली आहे.

या बैठकीत चेसीस स्विकारण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना सुद्धा बोलवण्यात आले आहे. बैठकीमध्ये यापु्र्वी चेसीस स्विकारण्यात आल्याची माहिती आणि चेसिस स्विकारतांना येणाऱ्या अडचणींची माहिती अधिकाऱ्यांना सोबत आणण्याच्या सुचना देण्यात आल्या असून, यावेळी टाटा मोटर्सचे अधिकारी सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगर पंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग; फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार मुदत; प्रभाग रचनेचा कार्यक्रम लागणार?

IND vs SL Test: भारतीय संघ ९ वर्षांनी श्रीलंकेत कसोटी खेळणार! कधी होणार सामने? तारखेबाबत मोठी अपडेट

Pune Crime : खराडीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पतीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

Municipal School : महापालिकेच्या पाच शाळांचे खासगीकरण; नऊ वर्षांत मोजणार १०१ कोटी रुपये

Pune Road Crash: मुंढव्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार

SCROLL FOR NEXT