मुंबई

लय भारी बातमी : चित्रपट पाहा आणि माथेरानमध्ये मोफत फिरा

सकाळ वृत्तसेवा

नेरळ : "शहीद भाई कोतवाल' चित्रपटाच्या प्रेक्षकांना थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये वर्षभर मोफत प्रवेश मिळणार आहे. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी ही घोषणा केली. हा चित्रपट 24 जानेवारीला राज्यभर प्रदर्शित होत आहे. 

स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथेरान पालिकेच्या वतीने आज एका कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी सावंत यांनी ही घोषणा केली. कार्यक्रमाला नगरसेवक शकील पटेल, माजी नगरसेवक दिनेश सुतार, कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे, रत्नदीप प्रधान, राजेंद्र रांजणे, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, अमित भस्मा, पालिकेचे कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे, अन्सार महापुळे, कोतवाल ब्रिगेडचे अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर, चित्रपटाचे दिग्दर्शक एकनाथ देसले आणि हुतात्मा हिराजी पाटील यांची भूमिका करणारे कलावंत परेश हिंदुराव हे उपस्थित होते. 

हे वाचा :थांबायचे नाय गड्या 

माथेरानचे सुपुत्र हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावरील चित्रपट येत आहे, ही गौरवाची बाब आहे. त्यामुळे हा चित्रपट सिनेमागृहात पाहणाऱ्या प्रेक्षकांनी ते तिकीट माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटनासोबत आणावे. या देशप्रेमी पर्यटकांकडून प्रवेश शुल्क घेण्यात येणार नाही. ही सवलत वर्षभर सुरू राहणार आहे. 
- प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT