Mumbai-Attack 
मुंबई

त्या गोळीच्या जखमा...

मंगेश सौंदाळकर

२६ नोव्हेंबर रोजी सीएसटी स्थानकात झालेल्या गोळीबारातील एक गोळी देविका रोटावनच्या पायाला लागली. आजही त्या गोळीच्या वेदना ती सहन करीत आहे. केवळ शारिरीकच नव्हे, तर मानसिक आणि आर्थिकही.
देविका मुळची राजस्थान. ९ वर्षांची होती तेव्हा ती. त्या रात्री वडिल आणि मोठ्या भावासोबत पुण्याला नातेवाईकांकडे जाण्याकरीता ती छत्रपती शिवाजी टर्मिनसला आली होती. गाडीला वेळ असल्याने तिचा भाऊ लघुशंकेला गेला होता. तेवढ्यात क्रुरकर्मा दहशतवादी अजमल कसाब सीएसटी स्थानकात बेछुट गोळीबार करीत घुसला. त्यातील एक गोळी देविकाच्या पायाला लागली. नंतर रक्तबंबाळ अवस्थेत तिला सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारांनंतर तिला शस्त्रक्रियेकरता जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर आतापर्यंत ६ वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

रुग्णालयात मोठा भाऊ जयेश तिच्यासोबत असायचा. कधी डॉक्‍टर, परिचारिका न आल्यास तोच देविकाची मलमपट्टी करायचा. ते पाहून अन्य रुग्णही त्याला मलमपट्टी करण्यास सांगायचे. ते करताना ग्लोव्हज्‌ घालायचे असतात, मास्क लावायचा असतो हे त्याला माहितच नव्हते. परिणामी जयेशला जंतूसंसर्ग झाला.

घशाला गाठ आली. शस्त्रक्रिया करून ती गाठ काढली तोच त्याच्या पाठीला कुबड आले. धडधाकट भावाचे आयुष्यच त्या गोळीमुळे बदलून गेले.
देविकाच्या वडिलांचा ड्रायफ्रुटचा व्यवसाय होता. तोही या घटनेनंतर व्यवसायही बंद पडला. नातेवाईकांनीही साथ सोडली. तब्बल ९ वर्षानंतर तिला पहिल्यांदा एका लग्नकार्याकरता राजस्थानला बोलवले गेले. या घटनेमुळे तिला शाळेतही प्रवेश देण्यात येत नव्हता. हे अगदीच अतार्किक. पण तसे घडले. अखेर एका विद्यार्थी संघटनेमुळे देविकाला शाळेत प्रवेश मिळाला. त्यातच तिची चार वर्षे वाया गेली. शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर देविका हिम्मत हरली नाही. 

काही महिन्यांपूर्वी देविकाला गंभीर संसर्गजन्य आजार झाला. २६/११ हल्ल्यानंतर सरकारने त्यांना तीन लाखांची मदत केली. पण ती सर्व मदत औषधोचार आणि आजारपणातच गेली. औषधांचा खर्च परवडत नसल्यामुळे तिने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट केले. अखेर दिल्लीतून एक फोन आला. दीड वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात पत्रव्यवहार केल्यानंतर मदत तिला मिळाली. पण त्या गोळीमुळे झालेल्या या अनेक जखमा त्याने कशा भरून निघणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Sanatan Martand Award : वाराणसी येथील 'संस्कृती संसद २०२६' मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च 'सनातन मार्तंड' पुरस्कार प्रदान

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : ५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवाच! हर्षवर्धन सपकाळांचे मंत्र्यांना खुले आव्हान

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

SCROLL FOR NEXT