मुंबई

लॉकडाऊन सुूरू आहे! पण तळीरामांचा हौदोस काही थांबेना... वाचा काय घडलंय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात लॉकडाऊनच्या काळातही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याविरोधात राज्यस्तरावर कारवाई सुरू केली असून 24 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत राज्यात 2809 गुन्हे नोंदविले आहेत. 1143 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 162 वाहनांसह 7.17 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात लॉकडाऊन असल्याने अवैध मद्यविक्री आणि वाहतूक केली जात आहे. बनावट मद्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. कुठेही अवैध मद्यविक्री होऊ नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे राज्यभरात अवैध मद्यविक्री, उत्पादन आणि वाहतुकीवर कारवाई केली जात आहे. बुधवारी (ता. 15) एकाच दिवशी राज्यात 112 गुन्ह्यांची नोंद झाली. 40 आरोपींना अटक करण्यात आलीय पाच वाहनांसह एकूण 32 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
ंबईत दहा लाखांचा साठा जप्त बुधवारी अंधेरी-कुर्ला रोड मार्गावरील अंधेरी पूर्व परिसरात विदेशी मद्यविक्रीवर कारवाई करण्यात आली. 161 लिटर मद्य, 39.75 लिटर वाईन आणि 585.75 लिटर बीयरसह 10 लाख 24 हजार 668 किमतीचा साठा जप्त करण्यात आला. एकाला अटकही करण्यात आली. निरीक्षक प्रसाद सास्तुरकर, निरीक्षक दीपक परब आदींच्या पथकाने कारवाई केली. 

इथे करा तक्रार 
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधातील तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक ः 18008333333. व्हॉट्‌सऍप क्रमांक ः 8422001133.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT