Income Tax Office
Income Tax Office 
मुंबई

प्राप्तिकर छाप्यांत 29 कोटी जप्त 

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर विभागाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 29 कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त
केली आहे. प्राप्तिकर विभाग मौल्यवान वस्तू व रोख रकमेच्या देवाणघेवाणीवर लक्ष ठेवून आहे. त्या अंतर्गत करण्यात आलेल्या अशा कारवाया करण्यात येत आहेत.


प्राप्तिकर विभागाने मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांत संवेदनशील ठिकाणी जलद प्रतिसाद पथके (क्विक रिस्पॉन्स टीम) तैनात केली आहेत. राज्यात उद्या सोमवारी (ता. 21) मतदान होणार असून, तोपर्यंत ही जलद प्रतिसाद पथके 24 तास कार्यरत राहणार आहेत.

पैशांच्या बेकायदा वाटपासंबंधी विश्वासार्ह माहिती मिळाल्यावर राज्य पोलिसांचे सहकार्य घेऊन
प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. इतर संस्थांशी समन्वय साधून कार्य केले जात आहे, अशी माहिती प्राप्तिकर खात्च्यायाच्या मुंबई विभागाकडून देण्यात आली. 

 
विधानसभा निवडणूकमुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात; तसेच या काळात पैशाचा गैरवापर होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. निवडणूक
आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर-1 (अन्वेषण) मुंबईच्या मुख्य संचालकांना राज्यासाठी प्राप्तिकर विभागाचे नोडल
अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT