mumbai bandra worli sea link accident 
मुंबई

Mumbai Accident News: वांद्रे-वरळी सी-लिंकवर कारने सहा वाहनांना उडवलं! तीन ठार, सहा जखमी

वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

रोहित कणसे

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल प्लाझा येथे गुरुवारी एका वेगवान कारने सहा वाहनांना धडक दिल्याने तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश असून जखमींपैकी दोघे अत्यावस्थ आहेत.

सी लिंकवरील टोल प्लाझाच्या अवघ्या 100 मीटर आधी हा अपघात झाला. एका इनोव्हा गाडीने मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर पळून जात असताना टोल नाक्यावर थांबलेल्या वाहनांना ईनोव्हा कारने उडवले. या अपघातात ईनोव्हा गाडीतील तिघांचा मृत्यू झाला आहे.अपघातात चालक देखील जखमी झाला असून चालकासह अन्य चौघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला लिलावती रूग्णालयात हलवण्यात आलं आहे.

वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर चालकाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाणार आहे. सुरुवातीच्या धडकेनंतर कारचा वेग वाढला आणि टोलनाक्यावरील आणखी वाहनांना धडक देण्यात आली अशी माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या एका घटनेत, बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेवर ट्रकने खासगी बसला धडक दिल्याने दोन जण ठार झाले आहेत. नागपूरपासून सुमारे 350 किमी अंतरावर असलेल्या बुलढाण्यातील मेहकर भागात हा अपघात झाला, बस चालकाने गाडीचे टायर तपासण्यासाठी एका लेनमध्ये वाहन थांबवले होते. ही बस मुंबईहून नागपूरला जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT