मुंबई

राज्यात लवकरच तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन! मंत्र्यांनी दिले संकेत

विराज भागवत

मुंबई: गेले काही दिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दिवसा जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू आणि शनिवार-रविवारी वीकेंड लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. पण तरीदेखील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे निरपराध लोकांचा जीव वाचवण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्हीनाइनशी बोलताना व्यक्त केले. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता काही दिवसांत रूग्णांवर उपचार करायला आरोग्यसेवक कमी पडतील. याचा वेळीच विचार करून तीन आठवड्याचा कडक लॉकडाउन करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ट्रेनच्या प्रवासावरही निर्बंधांचा विचार!

"राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पण कोणत्याच प्रयत्नांना यश येत नाही. त्यामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन गरजेचा आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला चुकीची वागणूक देत आहे. लसींचा तुटवडा असूनही महाराष्ट्राला पुरवठा कमी केला जातोय. अशा परिस्थितीत लॉकडाऊन गरजेचा आहे. तसेच मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावरही पुन्हा एकदा निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे", असे वडेट्टीवार म्हणाले.
'पहचान कौन?'; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

विरोधकांनी राजकारण न करता उपाय सुचवावेत!

"आगामी 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. सध्या भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातंय. परिस्थिती लक्षात घेता विरोधकांनी यावरुन राजकारण न करता आम्हाला उपाय सुचवावेत. गुजरातमध्ये अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन आहे. पण महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तरच भाजपचे नेते टीका करतात", अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT