Dadar-Flower-Market
Dadar-Flower-Market 
मुंबई

दादर फूलबाजारात ३०० टन कचरा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गणेशोत्सवात विविध प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. दादरमधील फूलबाजारात शेकडो टन फुले येतात. त्यापैकी विकली न गेलेली फुले आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. फूलबाजारातून दोन दिवसांत ३०० टन कचरा महापालिकेने उचलला. 

दादरच्या फूलबाजारातून मागील दोन दिवसांत तब्बल ३०० टन कचरा महापालिकेने उचलला, अशी माहिती दादर सफाई कामगार पर्यवेक्षक अरविंद गोईल यांनी दिली. गणेशोत्सवापूर्वीही सतत पाऊस पडत असल्याने बाजारात आलेली काही फुले खराब होती. अशी खराब फुले विक्रेत्यांनी आधीच फेकून दिली. त्यानंतर विक्रीपर्यंतच्या काळात खराब झालेली फुले फेकण्यात आली, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. कचऱ्यात झेंडूची फुलेच अधिक होती. गणेशोत्सवापूर्वी एक-दोन दिवस तर कित्येक किलो फुले पायदळी तुडवली जात होती. 

गणेशोत्सवाच्या दिवसांत भक्त हार, आरास आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करतात. त्या काळात दादरमधील फूलबाजारात भाविकांची मोठी गर्दी असते. सतत सुरू असलेल्या पावसात फुले भिजल्यामुळे मोठी नासाडी झाल्याने कचऱ्यात वाढ झाल्याचे सफाई कामगारांनी सांगितले. त्यातच भाविकांनी घरात वापरलेली फुले निर्माल्य झाल्यावर कचराकुंडीत टाकली. ओल्या कचऱ्याचे इमारतीच्या आवारात खतात रूपांतर करण्याचा प्रयोग अजूनही वेग घेत नाही, हेच यातून दिसले, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT