Kurla LTT Police Forces 
मुंबई

एक एप्रिलपासून ३२ लाख नागरिकांनी सोडला महाराष्ट्र

इतके लाख नागरीक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निघून गेले.

दीनानाथ परब

इतके लाख नागरीक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निघून गेले.

मुंबई: एक एप्रिलपासून आतापर्यंत ३२ लाख नागरीक महाराष्ट्राबाहेर गेले (left maharashta) आहेत, अशी माहिती इंडस्ट्रीयल सुरक्षा आणि आरोग्याचे आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिली. यावेळी कोरोनाची दुसरी लाट आणि निर्बंधांची पार्श्वभूमी आहे. बाहेर गेलेल्या नागरिकांपैकी ११ लाख नागरीक उत्तर प्रदेशात (uttar pradesh) तर ४.५० लाख नागरीक बिहारमध्ये (bihar) निघून गेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांना महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी फक्त कोरोना एक कारण नाहीय, तर लग्नाचा मोसम सुरु आहे. (32 lakh have left maharashta since April 1)

उन्हाळी सुटट्यांमध्ये सुद्धा लोक गावी जातात. डायरेक्टोरेटकडे ३८ हजार कंपन्यांची नोंदणी आहे. ६० टक्क्यापेक्षा जास्त कंपन्या ५० टक्के कामगारांवर सुरु आहेत, असे कल्याणकर म्हणाले. मुंबई महानगर क्षेत्रातील बांधकाम साईटसवर ७५ टक्के कामगार काम करतायत, असे Credai-MCHI चे अध्यक्ष दीपक गोराडीया यांनी सांगितले.

"रेल्वेकडून आम्हाला हे आकडे मिळाले आहेत. प्रवासासाठी वाहतुकीचे साधन उपलब्ध होते. रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्यावर भर होता. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया सुरु आहेत. त्यामुळे शेतीकाम आणि लग्नासाठी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर गेल्याची शक्यता" कल्याणकर यांनी व्यक्त केली.

"सुरुवातीला ५० टक्के आसन क्षमतेचा नियम मोडून नागरीक राज्याबाहेर गेले. पण आता फारच कमी बसेस सीमा ओलांडून जात आहेत. राज्यात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक केल्यामुळे अनेकांचा उत्साह मावळला, आणि यावेळी मागच्यावेळ सारखा गोंधळ नाहीय" असे राज्य वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT