36 lakhs fined on defaulting contractors for Metro 2A mumbai pm narendra modi
36 lakhs fined on defaulting contractors for Metro 2A mumbai pm narendra modi Esakal
मुंबई

Mumbai Metro : मेट्रो 2 अ साठीच्या कामचुकार कंत्राटदारांना फक्त 36 लाखांचा दंड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या बहुप्रतिक्षित मेट्रो 2 अ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कामाअंतर्गत कंत्राटदाराला 36 महिन्यांची मुदत वाढवून दिली असतानाही कामचुकार कंत्राटदारांवर फक्त 36 लाखांचा दंड आकारल्याची माहिती समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएकडे मेट्रो कामाची सद्यस्थिती आणि कंत्राटदारांवर आकारलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती मागितली होती. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोरेशनने त्यांना कळविले की दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या मेट्रो 2 अ ही सेवा 31 डिसेंबर 2019 रोजी सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा दहिसर पूर्व पासून डहाणूकर वाडी ही सेवा 2 एप्रिल 2022 रोजी सुरु करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी 2023 रोजी पूर्ण करण्यात आले. यास 36 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. सिव्हिल कामात सुरक्षा उल्लंघन आणि साईटवर सुरक्षा सुधार बाबतीत सुरक्षा दंड आकारला आहे.

पण त्याची माहिती दिली नाही. इलेक्ट्रिकल कामात करण्यात आलेल्या दिरंगाईबाबत 36 लाखांचा दंड आकारला आहे. यात माविन स्विचगर्स अँड कंट्रोल या कंत्राटदारांस 4.44 लाख रुपये, स्टर्लिंग अँड विल्सन व सिमेचेल इलेक्ट्रिक या कंत्राटदारांस 1.50 लाख रुपये, जॅक्सन या कंत्राटदारांस 1.53 लाख रुपये, केटीके ग्रुप चीन या कंत्राटदारांस 28.54 लाख रुपये इतका दंड आकारला आहे.

ही सर्व कामे पूर्ण होण्यात झालेली दिरंगाई लक्षात घेता दंड आकारण्यात एमएमआरडीएने कंजुषी केली असल्याचे गलगली यांचे मत आहे. अशा कंत्राटदारांसाठी दिलेल्या सूटीमुळेच प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही, असे गलगली यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT