Dombivli local Train esakal
मुंबई

Mumbai Local: लोकलच्या गर्दीमुळं डोंबिवलीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मित्राने अथक प्रयत्न केले, पण केयुर वाचलाच नाही

लोकलच्या (Local Train) गर्दीमुळे डोंबिवलीतील (Dombivli) एका 37 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवलीत राहणारे केयुर सावळा व बबन शिलकर हे दोघे गुरुवारी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले.

डोंबिवली : लोकलच्या (Local Train) गर्दीमुळे डोंबिवलीतील (Dombivli) एका 37 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. केयुर सावळा असे मृत तरुणाचे नाव असून गुरुवारी सकाळी कोपर ते दिवा स्थानकाच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. केयुरचा लोकल प्रवासातील मित्र बबन शिलकर याने त्याचा जीव वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे केयुरचा जीव वाचू शकला नाही.

डोंबिवलीत राहणारे केयुर सावळा व बबन शिलकर हे दोघे गुरुवारी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले. डोंबिवली स्थानकातून (Dombivli Station) सकाळची 9 वाजून 25 मिनिटांची जलद लोकल ते नेहमी पकडतात. गुरुवारी सकाळी देखील ते ही लोकल पकडण्यासाठी स्थानकात उभे होते. लोकलला गर्दी असल्याने कसरत करत दोघांनी आत चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बबनला आतमध्ये शिरता आले, मात्र केयूरला आत शिरता येत नव्हते. बबनच्या पाठीमागे लोकलच्या दारात गर्दीमुळे अडकला. केयूर दारात अडकल्यामुळे बबन यांनी त्याला हात दिला. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

बबनच्या हातातला केयूरचा हात सुटला आणि दिवा स्थानका जवळ केऊर लोकल मधून खाली पडला. केयूर लोकल मधून पडल्यानंतर बबन यांनी दिवा रेल्वे स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. केयुरला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्यात आली. परंतु, रुग्णवाहिका बाहेर गेली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. उशीर व्हायला नको म्हणून बबन यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या केयुरला तीन चाकी टेम्पो मध्ये घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. केयूर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लोकांच्या गर्दीमुळे डोंबिवलीतील आणखीन एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे, त्यातच जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी त्वरित रुग्णवाहिका मिळत नाही, टेम्पो मधून त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याची नामुष्की प्रवाशांवर येते. मध्य रेल्वे मार्गावर 5 वी, 6 वी लाईन करून सुद्धा प्रवाशांना त्याचा फायदा झाली नाही, असे प्रवासी सांगतात. तर डोंबिवली स्थानकात जास्त लोकल सोडव्यात. तसेच कर्जत - ठाणे, कसारा - ठाणे, कल्याण - ठाणे आणि ठाण्यावरून परतीच्या लोकल सोडव्यात, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT