ग्रह, ताऱ्यांची माहिती देताना शिक्षक. 
मुंबई

विद्यार्थ्यांनी हाताळले ग्रह आणि सूर्यमाला

चंद्रकांत खुताडे

डहाणू ः डहाणू तालुक्‍यातील शंकरपाडा जिल्हा परिषद शाळेत आज प्रत्यक्ष सूर्यमालाच अवतरली. शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांनी थ्रीडी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना ग्रहांची माहिती दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

 शाळेत दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान-परिसर अभ्यास विषयात "आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला' हा घटक प्रभावीपणे शिकवताना तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून विजय वाघमारे या उपक्रमशील शिक्षकाने एक्‍सप्लोअरर फॉर मर्ज क्‍यूब या मोबाईल ऍपचा कल्पकतेने वापर केला आणि सूर्य, बुध, शुक्र, शनी, पृथ्वी, मंगळ ग्रह आणि वर्गात प्रत्यक्ष थ्रीडी सूर्यमालाच विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली.

वाघमारे यांनी सूर्यमालेचा थ्रीडी अनुभव देण्यासाठी गुगल प्लेस्टोरवरच्या एक्‍सप्लोअरर फॉर मर्ज क्‍यूब हे ऍप डाऊनलोड करून त्याचा मार्कर इमेज असणारे मर्ज क्‍यूबची प्रिंट ऍपवर स्कॅन केली. 

मानवी कक्षेबाहेरील खगोलीय संकल्पना तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्का आदी घटक शिकवताना प्ले स्टोरवरील विविध शैक्षणिक ऍपचा वापर करून गरजेनुसार विषय समन्वय साधून तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना खगोलीय संकल्पना समजण्यास मदत होईल. 

आपण ज्या ग्रहावर राहतो तो पृथ्वी ग्रह लाल तांबूस. जेथे आपण नावे पाठवली तो मंगळ ग्रह, कडा असलेला शनि पाहून मुलांची जिज्ञासा आणखीच वाढली. त्यामुळे शिकण्यातला खरा आनंद मुलांनी घेतला. 
- विजय हणमंतराव वाघमारे, शिक्षक, शंकरपाडा शाळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT