mumbai local sakal
मुंबई

Mumbai : गर्डरच्या कामासाठी ४ तासांचा ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या 'या' लोकल उद्या रद्द

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ रेल्वे स्थानकादरम्यान असलेला डिलाईल रोड उड्डाणपूलचा दुसरा गर्डर टाकण्यासाठी गुरुवारी (ता.१५) रात्री चार तासांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे अनेक लोकल सेवा रद्द तर काही लोकल सेवेच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. (Mumbai local Railway news in Marathi)

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरच असलेला डिलाईल रोड उड्डाणपूल नव्या वर्षात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. लोअर परळ पुलाच्या पहिला गर्डर टाकल्यानंतर आता गुरुवारी दुसरे गर्डर टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी पश्चिम रेल्वेने १५ सप्टेंबरच्या रात्री चार तासांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक अप-डाउन जलद आणि धिम्या सर्वच मार्गावर असणार आहे.

गुरुवार रात्री १.१० ते शुक्रवारी पहाटे ५.१० वाजेपर्यत पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. या ब्लॉककालावधीत गुरुवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांची बोरीवली-चर्चगेट, रात्री १.०५ ची विरार-चर्चगेट या धिम्या लोकल अंधेरी - वांद्रे - दादर - मुंबई सेंट्रल दरम्यान अतिरिक्त जलद लोकल म्हणून चालविण्यात येणार आहे. पहाटे ४.१५ ची चर्चगेट-विरार धिमी लोकल पहाटे ४.३६ वाजता दादरहून, पहाटे ४.३८ ची चर्चगेट-बोरिवली धिमी लोकल सकाळी ५.०८ वाजता वांद्रेहून सुटणार आहे. रात्री ३.२५ ची विरार-चर्चगेट धिमी लोकल १५ मिनिटे उशिरा सुटणार आहे.

या गाड्या रद्द

- रात्री -१२. ३१ चर्चगेट - अंधेरी लोकल

- रात्री ०१ चर्चगेट - बोरिवली लोकल

- पहाटे- ०४.०४ अंधेरी - चर्चगेट लोकल

- पहाटे ०४.१९ चर्चगेट - बोरिवली लोकल

- पहाटे ०३.५० बोरिवली - चर्चगेट लोकल

- पहाटे०५. ३१ बोरिवली - चर्चगेट लोकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी रेल्वे मंंत्री मुकूल रॉय यांचं निधन, वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ड्रग लॉर्ड एल मँचोचा एन्काउंटर! सर्वात मोठं कार्टेल लष्करी कारवाईत उद्ध्वस्त; मेक्सिकोत उसळला हिंसाचार

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळीचे संकट ! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू, तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

IND vs SA: भारतीय संघाचा पराभव, पण बुमराह-अर्शदीपचे मोठे विक्रम; T20 World Cup इतिहासात ठरले सरस भारतीय गोलंदाज

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT