4 new power sweeping vehicles in KDMC dombivli  sakal
मुंबई

Dombivli : रस्त्यावरील धुळीपासून होणार सुटका! KDMCच्या ताफ्यात 4 नविन पॉवर स्विपिंग गाड्या

कल्याण डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहे, तर काही रस्ते हे दुरावस्थेत असल्यामुळे त्यांची धूळधाण झालेली पाहायला मिळत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहे, तर काही रस्ते हे दुरावस्थेत असल्यामुळे त्यांची धूळधाण झालेली पाहायला मिळत. कल्याण डोंबिवलीकरांची आता या समस्येतून सुटका होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या ताफ्यामध्ये 4 नव्या अत्याधुनिक पॉवर स्विपिंग मशीन गाड्या दाखल झाल्या आहेत.

कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. यामुळे रस्त्यांवरील धुळ साफ होऊन शहर अधिक टापटीप दिसणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कल्याण शहरातील रस्त्यांवर असलेल्या धुळीमुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. तसेच अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.

त्यावर आमदार भोईर यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. केडीएमसी आयुक्त डॉ. जाखड यांनी यासंदर्भात विनाविलंब कार्यवाही करत या अत्याधुनिक पॉवर स्विपिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही कालावधीपूर्वीच या 4 पॉवर स्वीपर गाड्या केडीएमसीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असून त्यादिवशीपासून या गाड्या नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले. या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गाड्या असून आधीच्या गाड्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.

मुख्यतः सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या सफाईसाठी ही गाडी वापरण्यात येणार आहे. त्याव्दारे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील साचलेली धूळ उचलून दुसरीकडे हा रस्ता पाण्याने स्वच्छ धुण्याचे कामही ही गाडी करणार आहे. तर डांबरी रस्त्यांसाठी शासनाकडून लवकरच दुसरी गाडी केडीएमसीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

तर कल्याणकर नागरिकांचा या धुळीच्या त्रासातून सुटका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. दरम्यान घनकचरा विभागाच्या या पॉवर स्विपिंग गाड्यांसह आमदार विश्वनाथ भोईर यांनी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक फायर बाऊजर गाड्यांचीही पाहणी करत समाधान व्यक्त केले. यावेळी केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, माजी नगरसेवक मोहन उगले, केडीएमसीचे उपअभियंता श्याम सोनवणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यपथावर देशभक्तीचा जल्लोष! प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा कसा असेल? यावर्षीची थीम काय? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे राष्ट्राला संबोधन- "युवा पिढी देशाच्या बहुआयामी विकासाला दिशा देत आहे"

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनासाठी विद्यार्थ्यांना सहज बोलता येतील अशी भाषणं - एकाच क्लिकवर

Latest Marathi news Live Update : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुझफ्फरपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकवणार

IND vs NZ 3rd T20I : 1st ball, 1st wicket! जसप्रीत बुमराहच्या भन्नाट चेंडूवर टीम सेइफर्टचा उडाला त्रिफळा, Video पाहून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT