मुंबई

मुरबाडमधील प्रसिद्ध म्हसा यात्रेवर 48 सीसी टीव्हींची नजर 

सकाळ वृत्तसेवा

सरळगाव : दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या मुरबाड तालुक्‍यातील प्रसिद्ध म्हसा यात्रेवर यंदा 48 सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. येत्या 10 जानेवारीपासून ही यात्रा सुरू होत असल्याने आमदार कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 6) म्हसा ग्रामपंचायत कार्यालयात विविध खात्यांचे अधिकारी, व्यापारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. 

यात्रेसाठी महाराष्ट्रातून व्यापाऱ्यांबरोबरच यात्रेकरूही मोठ्या संख्येने येत असतात. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुख्य बाजारपेठ, बैल बाजार, घोंगडीबाजार, चादरी बाजार व मंदिर परिसर अशा 48 ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

यात्रेच्या काळात विद्युत पुरवठा सुरळीत राहावा म्हणून विद्युत तारांची देखभाल, पथदिवे यांचा आढावा विद्युत मंडळाचे अधिकारी सुरवाडकर यांच्याकडून घेण्यात आला. यात्रेदरम्यान आरोग्य खात्याकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली. यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून विशेष प्रवासी बस सोडल्या जातात. याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. 

यात्रेत जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी, अशा सूचना पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आल्या. म्हसा येथे जाण्यासाठी मुरबाड-म्हसा-टोकावडे ते म्हसा-कर्जत-म्हसा व बदलापूर-म्हसा अशी प्रवासी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती प्रदोष हिंदुराव यांनी दिली.

या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, तहसीलदार अमोल कदम, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, जिल्हा परिषद गटनेते उल्हास बांगर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन मोहोपे, कमलाकर भोईर, म्हसा ग्रामपंचायतीचे सरपंच ताराबाई कथोरे, उपसरपंच जीवन कुर्ले, मिठाई व्यापारी सुधीर तेलवणे, मंदिर कमिटीचे अध्यक्ष बाळू पष्टे उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Ganpati Decoration 2026: कागदी कमळ, केळीची पाने अन् कापसाचे ढग; यंदा गणपती सजावटीसाठी ट्राय करा १० भन्नाट अन् सोप्या आयडिया!

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT