Mumbai Crime  Sakal
मुंबई

Mumbai Crime : कल्याणमध्ये पुन्हा धक्कादायक घटना; 5 वर्षीय मुलावर डान्स शिक्षकाचा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

कोळसेवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण मध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या झाली ही घटना ताजी असतानाच एका शाळेमध्ये पाच वर्षे मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला गेला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

शाळेत डान्स शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षकानेच या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी डान्स शिक्षक समीर कदम याला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. कल्याण पूर्वेतील गुन्हेगारी कधी थांबणार, हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे.

कल्याण पूर्वेतील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 5 वर्षीय मुलगा आई वडिलांना आपल्याला बॅड टच झाल्याचे सांगत होता. सुरुवातीला त्याचे आई-वडील गोंधळले मात्र मुलगा त्याच्यासोबत काहीतरी अनैतिक प्रकार घडला आहे.

असे सांगत असल्याने पालकांनी चौकशी केली. आई-वडिलांनी शाळेत जाऊन विचारपूस करण्याचे ठरविले. मात्र, ही घटना शुक्रवारी घडली होती. शनिवार रविवारी शाळा बंद होती. सोमवारी आई वडिल शाळेत पोहचले आणि शाळेला माहिती दिल्यानंतर घटना समोर आली की, मुलासोबत शाळेच्या शौचालयात लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हे कृत्य दुसरे कोणी नाही तर शाळेत डान्स शिकविणाऱ्या समीर कदम याने केले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पालकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ समीर याला ताब्यात घेत चौकशी करत तपास सुरू केला आहे. कल्याण मध्ये घडणारी ही धक्कादायक घटना असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT