Shivdi crime 
मुंबई

Mumbai Crime: 5 वर्षांची चिमुरडी खेळत होती, शेजाऱ्याने उचलून स्वत:च्या घरी नेलं अन्...; शिवडीमध्ये संतापजनक घटना

Mumbai Shivdi crime: चिमुरडी खेळत असताना शेजाऱ्याने तिला उचलून स्वतःच्या घरी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai Crime: शिवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्यानेच बलात्कार केला आहे. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चिमुरडी खेळत असताना शेजाऱ्याने तिला उचलून स्वतःच्या घरी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी आर ए के मार्ग पोलिसांनी ३० वर्षीय नराधमाला अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(२) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मुंबईमधून दररोज काहीनाकाही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच हा शिवडीतील प्रकार समोर आला आहे. एका चिमुकलीसोबत असा प्रकार करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, उरणमधील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दाऊद शेख नावाच्या एका आरोपीने २२ वर्षीय यशश्री शिंदेची हत्या केलीये. तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १४ व्या वर्षी यशश्री शिंदेला त्रास दिल्या प्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तो तुरुंगात राहून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT