Drug  sakal
मुंबई

50 लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक; मुंबईत पोलिसांची कारवाई

माहिती मिळताच एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचून महिलेला अटक केली

सकाळ डिजिटल टीम

माहिती मिळताच एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचून महिलेला अटक केली

मुबंई - मुंबईतील एमएचबी पोलिसांनी बोरिवली परिसरातून एका गर्भवती महिलेला 50 लाख 75 हजार किमतीच्या हेरॉईनसह रंगेहात पकडले आहे. मुस्कान दीपक कनोजिया असे आरोपी महिलेचे नाव असून ती २३ वर्षांची आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. घटनेमुळे या परिसरात पोलिस तपासासाठी आणखी सतर्क झाले आहेत.

एमएचबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील सेंट फ्रान्सिस शाळेजवळ एक महिला ड्रग्ज पुरवण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार माहिती मिळताच एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचून महिलेला अटक केली आहे. या अटकेनंतर महिलेची चौकशी केली असता, पोलिसांनी तिच्याकडून 345 ग्रॅम, 50 लाख 75 हजारांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. एमएचबी पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेसंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KBC Contestant Arrest : 'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक धक्कादायक कारण आले समोर

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

Gold Rate Today: युद्धाचा आणि डॉलरचा सोन्यावर डबल इफेक्ट! मार्चमध्ये सोनं 30 हजारांनी स्वस्त; महाराष्ट्रात आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT