6 Crore fraud of Cosmos Bank case registered in Khadakpada police station mumbai police  Esakal
मुंबई

Crime News : दि कॉसमॉस बॅंकेची 6 कोटींची फसवणूक; खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गृह कर्ज मंजुरीसाठी बॅंकेस बनावट कागदपत्र सादर करत तब्बल 6 कोटींची फसवणूक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - गृह कर्ज मंजुरीसाठी बॅंकेस बनावट कागदपत्र सादर करत तब्बल 6 कोटी 12 लाख 62 हजाराला दि. कॉसमॉस बॅंकेची कर्जदारांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी बॅंकेचे वसुली विभागातील कर्मचारी शरद बेदाडे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात कन्सलटंट कंपनीचे शैलेश ताकभाते, सचिन पाटील, ईस्माईल शेख, योगेश जालंद्र, विनोद यादव, दत्ता आव्हाड यांसह लाभार्थी कर्जदार व इतर कर्जदार यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दाखल तक्रारीनुसार दि. कॉसमॉस को. ऑप. बॅंकेची कल्याण येथे शाखा आहे. या शाखेत गृहकर्ज मंजुरीसाठी 25 कर्जदारांची बनावट कागदपत्र सादर करत 6 कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. बॅंकेकडे बनावट कागदपत्र सादर करुन सदर कंपनीने कर्जदारांना गृह कर्ज बॅंकेकडून मंजूर करुन घेण्यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली.

मध्ये त्यांच्या कंपनीतील सहकारी, संबंधीत कर्जमंजुरीसाठी नियुक्त केलेली तृतीयपक्ष कंपनी, लाभार्थी गृहकर्जदार व इतर संबंधितांनी मिळून आपसात संगनमत करुन बनावट व खोटी कागदपत्र तयार करुन ती कर्जमंजुरीसाठी बॅंकेत सादर केली आणि बॅंकेची 6 कोटी ला फसवणूक केली असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरिक्षक ए.एन.घस्ते याचा अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT