6-year-old boy dies falling into pit dug for lift dombivali mumbai  sakal
मुंबई

लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यु

सागावच्या घटनेची पुनरावृत्ती; अनधिकृत अर्धवट बांधकामे लहानग्यांच्या जीवावर

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील सागर्ली येथील एका 6 वर्षीय मुलाचा लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना सोमवारी घडली. वेदांत जाधव असे मुलाचे नाव आहे. सदर इमारतीचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून अपूर्ण अवस्थेतील बांधकामे लहान मुलांच्या जीवावर बेतत आहेत. जानेवारी महिन्यात सागाव येथे देखील अशाच एका अपूर्ण बांधकाम असलेल्या इमारतीतील लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. सागावच्याच घटनेची ही पुनरावृत्ती असून आणखी असे किती जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सागर्ली येथील विघ्नहर्ता सोसायटीमध्ये वेदांत जाधव हा आजी, आजोबा आणि वडिलांसह रहातो. केवळ परिवाराचाच नाही तर शेजाऱ्यांचाही वेदांत हा लाडका होता. शेजारी राहणारे अवंतिका महाडिक व इला महाडिक हे देखील त्याचा तेवढ्याच मायेने सांभाळ करीत होते. सोसायटीच्या शेजारीच एका सात मजली इमारतीचे बांधकाम सुरु असून या ठिकाणी वेदांत कधी कधी खेळावयास जात असे. सोमवारी देखील वेदांत सकाळी 10.30 वाजता बाहेर खेळायला गेला होता, दुपारी 12 वाजले तरी तो घरी आला नाही म्हणून घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथील खड्ड्यातील पाण्यात वेदांत दिसून आला. दुपारी 2.30 च्या सुमारास त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता. वेदांत याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सदर इमारत ही अनधिकृत असल्याची प्राथमिक माहिती असून कल्याण डोंबिवलीत असे अनेक अनधिकृत बांधकामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. ही अर्धवट बांधकामे लहान मुलांचा जीवावर बेतत आहेत. पाण्यामध्ये प्लास्टिकचा बॉल असून हा बॉल काढण्यासाठीच वेदांत गेला असावा आणि त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. 19 जानेवारीला सागाव येथील सत्यम मौर्य याचा लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT